काँग्रेस भवन सांगली येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
महात्मा ज्योतिबा फुले नेहमी म्हणायचे...!विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। बहुजन समाजातील स्त्री पुरुष शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी पुणे येथे स्त्रियांसाठी भिडे वाड्यामध्ये शाळा सुरू केली छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधी स्थान त्यांनी शोधून काढून शिवजयंती साजरा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असे उद्गगार शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याजयंतीनिमित्त अभिवादन करताना आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी स्वागत व प्रस्ताविक प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख व शेवटी आभार विश्वास यादव यांनी मांडले यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ प्रमोद इनामदार त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केली यावेळी सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले शहर जिल्हा सचिव मौलाली वंटमोरे विठ्ठलराव काळे नामदेव पठाडे अल्पसंख्यांक सेलचे देशभुषण पाटील जिल्हा सचिव सचिन चव्हाण उस्मान मगदूम सचिन घेवारे मीना शिंदे कांचन खंदारे सुरेश गायकवाड शरण सरोदे राहुल शिंदे रोहित गुंजीगणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते
