गणेश तलावाच्या पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

Admin
By -





             मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश तलावाच्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी अंदाजे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सदर महिला परिसरात फिरून लोकांकडून मदत स्वरूपात पैसे मागून आपला उदरनिर्वाह करत होती.
महिला पाण्यात पडल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी अनेक नागरिक उपस्थित होते; 
             याबाबतची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
           घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू पथकाने पाण्यात उतरून मृतदेह काढला असता त्या महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला. मात्र तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला होता.
           सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून या घटनेचा पुढील तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
          या कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सदस्य कैलास वडर, आसिफ मकानदार, सागर जाधव व महेश गव्हाणे यांनी सहभाग घेतला.
Tags: