*पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSS) इयत्ता 8 वी सांगली जिल्ह्यातील केंद्रे सज्ज...*
सांगली जिल्ह्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 22090 विद्यार्थी बसले असून त्यांची परीक्षा 130 केंद्रातून होणार आहे. केंद्र संचालक संख्या 130 उपकेंद्र संचालक संख्या 8 असून 1092 पर्यवेक्षक तसेच 278 शिपायांच्या नियंत्रणाखाली परीक्षा कामकाज सुरू राहणार आहे.
तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी 11115 विद्यार्थी बसले असून 79 केंद्रातून त्यांची परीक्षा होणार आहे. केंद्र संचालक 79 व उपकेंद्र संचालक संख्या 3 असून 558 पर्यवेक्षक तसेच 150 शिपायांच्या नियंत्रणाखाली परीक्षा घेणार आहेत. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 2298 कर्मचारी स्टाफ कार्यरत राहणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यमान प्रशासक जिल्हा परिषद सांगली श्री विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे नियोजन पूर्ण झाले आहे.
सदर परीक्षा रविवार दिनांक 22/02/2026 रोजी होणार असून पेपर पहिला... वेळ...11.00 ते 12.30 या वेळेत प्रथम भाषा व गणित व दुसरा पेपर 2.00 ते 3.30 यावेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे पेपर संपन्न होणार आहेत...
या परीक्षांना जिल्हा स्तरावरून डाएट सांगली, शिक्षण विभाग (प्राथमिक माध्यमिक व योजना) यांच्या व गटशिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरील भरारी पथकांच्या मार्फत तालुका निहाय भेटी देण्याचे नियोजन झाले आहे. तसेच राज्य स्तरावरुन सांगली जिल्हयासाठी निरीक्षक म्हणून श्रीमती प्रभावती कोळेकर शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचीही नियुक्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत करणेत आली आहे...
शिष्यवृत्ती परीक्षा वस्तुनिष्ठपणे व पारदर्शक पद्धतीने घेण्याच्या तसेच परीक्षेला कोणतेही गालबोट लागू नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी केले आहे.
शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. मोहन गायकवाड यांनी सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व साहित्य प्राप्त असून यंत्रणा सज्ज झाली असलेने कामकाज सुरळीत चालेल व परीक्षा निकोप व पारदर्शक वातावरणात होतील. त्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना शुभेच्छा दिल्या. सदर परीक्षा जिल्हा नोडल अधिकारी म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री नागेश ठोंबरे, श्रीमती सुजाता दरूरे, श्री जयंत सातपुते, श्री प्रशांत शेटे इ. काम पाहत आहेत....
