एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता आपल्या परिसरात आले हे कळताच त्यांचा चाहता वर्ग हा त्याची एक झलक बघण्यासाठी आतुर झालेल असते,
असाच प्रकार आज कोल्हापूर मध्ये घडला
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘ईठा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती कोल्हापुमध्ये आली होती, तिने अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तिच्या आगमनाची माहिती तिच्या चाहत्यांना मिळताच मंदिर परिसरात चाहत्यांची तिला बघण्यासाठी एकच गर्दी केली. श्रद्धाने शांतपणेअंबाबाईचे दर्शन घेतले आणि चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे ईठाचे दिग्दर्शन करत आहेत. यासाठी श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून ती विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विठाबाई यांच्या आयुष्यावर आधारीत अशी या चित्रपटाची कहाणी आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापुरातील विविध ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं.
