गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत गुरुवार, दि. ०४ सप्टेंबर रोजी “जल्लोष माय मराठीचा” सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोस्तव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा उत्सव असल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनामार्फत दिनांक ०४ सप्टेंबर रोजी सायं. ०६ ते ०९ या कालावधीमध्ये “जल्लोष माय मराठीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे केलेले आहे. तरी या कार्यक्रमास सर्व कोल्हापूरकरांनी हजेरी लावून उस्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करणेत येत आहे.