समाज स्वास्थ्यासाठी पसायदान आजही मार्गदर्शक

Admin
By -




शिवशक्ती डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानमालेत 'पसायदान'या विषयावर बोलताना समाज प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख. व्यासपीठावर अविनाश पाटणे, महालिंग आंबोळे, नरेंद्र पाटील.



     सुसंस्कृत, सदविचारी आणि  सत्कर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या समाज निर्मितीसाठी संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची आजच्या काळात अधिक गरज आहे, असे मत समाज प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले.
           शिवशक्ती डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानमालेत 'पसायदानाचे आजच्या युगातील महत्त्व' या विषयावर देशमुख बोलत होते. राजमती भवनमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष महालिंग आंबोळे  होते.व्याख्यानमालेस सलग दुसऱ्या दिवशीही श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
देशमुख म्हणाले, ज्ञानेश्वरी ग्रंथाचा समारोप केल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक परमेश्वराकडे या सर्व विश्वाचे,  त्यामधील सर्व प्राणिमात्रांचे कल्याण होऊ दे,अज्ञानाचा अंधकार दूर होऊ दे अशी प्रार्थना केली होती. आज या प्रार्थनेची आणि या प्रार्थनेतील तत्त्वज्ञानाची समाजाला अधिक गरज आहे. स्वार्थ, सत्तेसाठी स्पर्धा, सर्व प्रकारच्या मूल्यांचा ऱ्हास अशी आज सर्वत्र परिस्थिती दिसते आहे. त्यामुळे समाज स्वास्थ्यासाठी आज पसायदानातील तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. 
ते म्हणाले, सातशे वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी सर्व विश्वाच्या कल्याणाची ही प्रार्थना केली होती. मात्र सात शतकानंतरही या प्रार्थनेचे महत्त्व अबाधित आहे. 
           श्री. आंबोळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.परिचय फाउंडेशनचे संचालक अविनाश पाटणे यांनी करून दिला. आभार फाउंडेशनचे खजिनदार सुनील बुकटे यांनी मानले. संजीवनी आवटी यांनी पसायदान सादर केले. 
यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव हर्षद सावळे, संचालक राजेश साबणे, संजय हिरेकर,उद्योजक मनोहर सारडा, उद्योजक सुशील हाडदरे, अशोक कोठावळे, शंकरराव तायशेट्टी, रवींद्र भुकटे , प्रसिद्ध व्यावसायिक आप्पा रिसवडे, बांधकाम व्यवसायिक खंचनाळे, सी.ए.दीपक पैलवान,  प्रसिद्ध व्यापारी सुरेशआण्णा हिडदुग्गी, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज,प्रा. डॉ. संजय ठिगळे, प्रमोद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.