तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घेणेसाठी अर्ज करावेत - जिल्हाधिकारी, अमोल येडगे*

Admin
By -



समाज कल्याण कार्यालयात तृतीयपंथी मदत कक्ष स्थापन करण्यात येणार



         कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर (टीजी) पोर्टलवरून तृतीयपंथी असलेबाबत ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे. तृतीयपंथीयांचे  हक्क व अधिकार यांचे संरक्षण तसेच त्यांच्याबाबत राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व इतर विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन निवारण करणे, राष्ट्रीय पोर्टलवर ओळखपत्र मिळवण्यासाठी त्यांची संख्या वाढवण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर या ठिकाणी तृतीयपंथी मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा तृतीयपंथी तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जादूटोणाविरोधी प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत येणा-या समितीची व जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.

            बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. जगन कराडे, संतोष तोडकर, तृतीयपंथी समुदाय प्रतिनिधि  शिवानी गजबर, सहायक आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच समाजकल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे, अतुल पवार उपस्थित होते.