पुन्हा सुरू होणार बाईक टॅक्सी सेवा कोणत्या शहरात हे वाचा

Admin
By -




           मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा काही कंपन्यांनी सुरू केलेली होते .परंतु ही वाहतूक बेकायदेशीर असल्याने आणि आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनाने केला. त्यामुळे परिवहन विभागाने  यावर कारवाई करत या कंपन्यांच्या दिवसतील टॅक्सी सेवा बंद केले होते. ती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने ओला ,उबर प्रमाणे बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मसुदा तयार केलेला आहे. 
     महाराष्ट्र ॲग्रीगेटर रेग्युलेशन 2024 असे या मसुद्याचे नाव असून मोटर वाहन विभागाने हा मसुदा मंगळवारी मंत्रालय मध्ये झालेल्या बैठकीत मांडलेला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला दुजोरा दिलेला आहे. ही नियमावली प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता देऊन तयार केल्याचेही सांगण्यात येत आहे .

बाईक टॅक्सी मुळे नवा रोजगार निर्माण होऊन याद्वारे महिलांनाही रोजगाराच्या संधी मिळू शकतात.