४ जानेवारी शनिवारी सकाळी११.३० वाजता ११२ कंट्रोल रूमचा फोन खणखणला आणि समोरून आवाज आला सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे, पोलिस मदत हवी आहे' असे सांगितले आणि फोन कट झाला .मग काय पोलिसांची. एकच धावपळ सुरू झाली. हा कॉल शहर पोलिस ठाण्याकडे डायल ११२ वर कार्यरत पोलिस कर्मचारी वसिम मुलाणी यांना ट्रान्सफर झाला. त्यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ आदेश दिले पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे बॉम्बशोधक पथकानी तपासणी केली. परंतू तेथे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. त्यामुळे खोटी माहिती असण्याचे स्पष्ट झाले. सरते शेवटी तो खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मालगाव (ता. मिरज) येथील यमनाप्पा मरगप्पा माडर (वय ५०, रा. तवटे मळा) या तळीरामास ताब्यात घेतले.
112वर आला कॉल आणि सर्वाची झाली एकच पळापळ
By -
January 05, 2025