कर्ज मंजूर करून घेतले पण प्रकल्पच उभा केला नाही, सांगली मधील विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा नोंद

Admin
By -




         बेदाणा प्रक्रिया व प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली 1कोटी 98 लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार सांगलीमध्ये एका नामांकित बँकेने पोलिसात दिलेली आहे 
बँकेची ही फसवणूक 23 नोव्हेंबर 2022 ते 21 डिसेंबर 2024 या कालखंडामध्ये घडलेला असून मुकुंद हनुमंत जाधवर, स्वप्नाली मुकुंद जाधवर, सखुबाई हनुमंत जाधवर (दिघे रा.मधाळे चौक, मारुती मंदिर ,वालवड, ता. बार्शी जिल्हा सोलापूर) विजय शैलेश कराड (वय वर्षे 31 रा. सदारू कृपा, दत्तनगर ,भालगाव ता. बार्शी ) राजाराम विठ्ठल खरात (वय वर्ष 48 रा.खाडे वस्ती, लोहमार्गाजवळ एरंडोली रस्ता बेडग ,ता. मिरज) अजित विष्णू दळवी (रा. एरंडोली) व लता विठ्ठल जाधव ( रा. पायपाची वाडी तालुका मिरज) अशी संशयतांची नावे आहेत या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या सातही संशयित डिस्ट्रिक्ट ऍग्रो  फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक असून शेतकरी आहेत .उत्पादक कंपनीपार्फत बेदाणा प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव त्यांनी सांगली मधील एका नामांकित बँकेत दाखल केला आणि ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चरल फंड योजनेतून कर्ज मिळावे अशी बँकेकडे मागणी केली .बँकेने कागदपत्राची छाननी करून प्रकल्प उभारणीसाठी 1 कोटी 98 लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. हे कर्ज गौरी कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मूव्हर्स, एस जे एम एम असोसिएशन अँड मल्टी  सर्व्हिसेस व शुभ गणेश   ऍग्रो इंडस्ट्रीज या तीन व्हेंडर कंपन्यांच्या  नावावर बँकांनी मंजूर केलेली रक्कम त्यांच्या खात्यावर ही  वर्ग केली 
हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून आटी शर्तीनुसार त्याची कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याची आट होते पण संशयितांनी बँकेकडे तारण असलेल्या जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले होते पण तो आज अखेर त्यानी उभा केलेला नाही आणि कर्जाची परतफेड ही केलेली नाही त्यामुळे बँकेने
 बँकेचे एक कोटी 98 लाख रुपयाची फसवणूक केली अशी फिर्याद बँकेतर्फे पोलीस मध्ये देण्यात आलेली आहे