महाराष्ट्रातील पायलेट प्रोजेक्टसाठी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाची निवड :

Admin
By -
सांगली जिल्हा व सत्र न्यायालय येथे अभिलेखांचे संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ : 




          सांगली जिल्हा न्यायालयामध्ये अभिलेखांचे संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. प्रदिप शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायाधीश 2 पी बी जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक श्रीमती एम एस काकडे, प्रभारी जिल्हा सरकारी वकील व्ही एम देशपांडे, सांगली बार असोसिएशनचे सचिव अमोल पाटील, डेटा सॉफ्ट कॉम्प्युटर सर्विसेसचे मधुसूदन अहिरे यांच्यासहित वकील आणि न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        भारतामध्ये न्यायालयीन अभिलेखांचे संगणकीकरण करण्याच काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा अभिलेखांचे संगणकीकरण बाबत पायलेट प्रोजेक्ट म्हणून सिलेक्ट करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात न्यायालयामधील प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या अभिलेखांचे संगणकीकरनाचे काम सुरू केलेले आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयातील चौदाशे सालापासून ते आतापर्यंतच्या सर्व अभिलेखांचे संगणकीकरण होणार आहे. एप्रिल किंवा मे 2025 पर्यंत प्रलंबित दाव्यांचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या प्रलंबित दाव्यांचे पूर्ण झाल्यानंतर, निकाली लागलेल्या केसेस यांचे देखील संगणकीकरण केले जाणार आहे. या संगणकीकरणामुळे पूर्ण पारदर्शकता येणार आहे, याशिवाय वेळ आणि पैसा या गोष्टींची बचत होणार आहे. आणि त्याचबरोबर हे अभिलेख खूप कालावधी पर्यंत जतन करणे सोयीचे होणार आहेत, अशी माहिती तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक श्रीमती एम एस काकडे यांनी दिली.