विजयाची हॅट्रिक करण्याचा समाजाचा निर्धार
सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला. सुधीरदादा गाडगीळ यांच्या विजयासाठी समाज झटून काम करेल. त्यांच्या विजयाची हॅट्रिक करेल, असेही समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
आमदार गाडगीळ यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सांगली जिल्हा भोई समाज तसेच विधानसभा क्षेत्र शाखा यांच्यावतीने बैठक घेण्यात आली. त्या बैठकीस सुधीरदादानाही आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीच्या वेळी माजी नगरसेवक ॲड. बालाजी काटकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. त्यांनी सुधीरदादांना पाठिंबा जाहीर केला. तसे निवेदनही पदाधिकारी आणि सदस्यांनी दादांना दिले. सांगली मतदारसंघातून त्यांच्या विजयाची हॅट्रिक अटळ असल्याचाही विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
सांगली, हरीपूर व इतर भागामधील भोई समाज बांधव यावेळी उपस्थित होते. सुधीरदादा गाडगीळ यांचे कार्य, प्रामाणिकपणा, स्वच्छ चारित्र्य व निस्पृहता यामुळे त्यांना समाज पाठिंबा जाहीर करीत आहे असे ॲड. काटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दादांना बहुमताने निवडून आणू अशी ग्वाही दिली.
यावेळी ॲड.बालाजी काटकर, ॲड.गणेश भोई, अमोल भिलवडीकर, गणेश आपटे, रवी कांबळे, किरण भोई, अविनाश चिनके, संजय बावधनकर, सागर मगरे,श्रीकांत कांबळे, सतीश बावधनकर , अजय लोखंडे, गणेश शिंदे, सचिन भोई, वैभव आपटे, शंतनू बावधनकर, कपिल बावधनकर, दिग्विजय शिंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.