सांगली विधानसभेची निवडणूक झाल्यापासून सांगली विधानसभेचा उमेदवार कोण ? याबाबत जोरात चर्चा होती. ज्यामध्ये जयश्री मदनभाऊ पाटील यानी जोरदार आघाडी घेत मोर्चे बांधनी केली होती.आज काँग्रेस कमिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगली विधानसभा मतदार संघातील आजी-माजी नगरसेवक, विविध समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व.मदनभाऊ पाटील यानी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही,उलट सर्व समाजाना न्याय देऊन त्यानी सामाजिक एकता जपली होती.आज बैठकीत उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यानी कोणत्याही परिस्थित उमेदवारी अर्ज भरावा अशी मागणी व्यक्त केली.यामुळे कार्यकर्त्यांचा जनरेटा बघून श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील दिनांक : 28 ऑक्टोंबर 2024 रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.यादिवशी सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व समाजातील तमाम वसंतदादा प्रेमी व समस्त काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकत आणि साथ श्रीमती जयश्रीवहीनी यांच्या मागे उभा करावी अस आवाहन करण्यात आले आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या सांगलीची नवीन संकल्पना घेवून बदल घडवण्यासाठी, तसेच सध्याच्या गावठाण आणि विस्तारीत भागाचे प्रश्न सोडवून नागरिकाना सुविधा मिळवून देण्याचे नियोजन करण्यासाठी, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. त्यासाठी समस्त मतदारांनी आपल्याला मतदान करण्यासाठी त्यांचा समोर जाऊ,तसेच या बदललेल्या सामाजिक वातावरणात छोट्या सामाजिक घटकाला धीर देण्याची जबाबदारी घेऊन, निर्माण झालेल्या सामाजिक तणावाच्या वातावरणात एकीची ताकत निर्माण करण्यासाठी तसेच आपण एक बदललेली विकसीत सांगली निर्माण करण्याची जबाबदारी घेऊन जनतेच्या दारात जाऊ असा बैठकीचा एकंदर सूर होता.
सांगलीकर जनतेने तिकीट कोणाला मिळणार याचा आता विचार सोडून देऊन कामाला लागावे.वरिष्ठ पातळीवर मलाच उमेदवारी देण्याचा शब्द मिळाला आहे,आजवर कोणताही स्वार्थ न ठेवता सातत्याने पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.यामुळे स्व.मदनभाऊ यांचा ज्या विकृतीने पराभव षड्यंत्र रचून केला त्याना गाडल्याशिवाय आता शांत बसायचे नाही. यावेळी माजी मंत्री प्रतीक दादा पाटील प्राध्यापक सिकंदर जमादार अजित सूर्यवंशी सुभाष खोत शेवंता वाघमारे सुषमा पाटील कयूम पटवेगार अनिल डुबल संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले