जाहीर आवाहन
११ सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला आनंदाचा क्षण. दरवर्षी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे वडीलधारी, माता-भगिनी, शुभचिंतक, सहकारी मित्र आवर्जून वाढदिवसानिमित्त शुभेच्छारुपी आशीवीद देत असतात. यामागे आपला स्नेह आणि आपुलकीची भावना असते, हीच भावना मला नेहमीच तुमची सेवा करण्याची प्रेरणा देते.
काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले असल्याने यंदा मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 10 व 11 सप्टेंबर रोजी मी प्रत्यक्ष व मोबाईल द्वारे सुद्धा उपलब्ध नसणार आहे तरी कोणीही डिजिटल स्वरूपाचे होडिंग किंवा बॅनर लावू नये त्या संदर्भात मी दिलगिरी व्यक्त करतो असेच आपले प्रेम, आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहोत.
आपलाच - शेखर इनामदार (भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक)