स्वयंपाकाचे तेल जास्त वेळ शिजविणे आरोग्यासाठी किती योग्य आयोग्य

Admin
By -




स्वयंपाकाचे तेल जास्त वेळ शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.”

आजकाल सर्व घरात स्वयंपाकासाठी तेलाचा वापर हा वेगाने वाढत आहे. बऱ्याच घरांत पुरी, भजी किंवा एखादे तळण केल्यानंतर उरलेले तेल परत वापरले जाते, तेलाचा हा पुनर्वापर सामान्य आहे. जवळजवळ प्रत्येक घरातील लोक उरलेले स्वयंपाकाचे तेल वापरतात. काही तळण्यासाठी वापरलेले तेल नंतर लोक भाजी, पराठे किंवा इतर कोणत्याही पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. पण दुसरा पदार्थ तयार करण्यासाठी एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे हे खूप हानिकारक ठरू शकते. खरंतर एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होते. बरेच लोक स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा रिफाइंड तेल वापरतात परंतु ते वापरण्याची योग्य पद्धत माहित नसते.

स्वयंपाक तेल वापरण्यासाठी विविध पद्धती आहेत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, स्वयंपाकाचे तेल जास्त वेळ शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

उरलेल्या तेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने, तुम्हाला अल्सर, ॲसिडिटी, जळजळ असे अनेक त्रास होऊ शकतात. एवढेच नव्हे तर उरलेल्या तेलाचा वापर आपल्या पचनासाठीही चांगला नसतो. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.