पृथ्वीवर जिथे नदी आणि समुद्र एकरूप होतात

Admin
By -


 



महाराष्ट्रामध्ये कोकणला पृथ्वीवरचा स्वर्ग मानले जाते. कोकणातील झाडे निसर्गरम्य दृश्य डोंगरदऱ्या आणि समुद्र पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करते ,याच  कोकणात संगम बेट  नावाचे सुंदर अदभूत असे बेट आहे. हे बेट नदी आणि समुद्राच्या अद्भूत मिलनामधून तयार झाले आहे. याठिकाणी कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो. यामुळेच देवबाग समुद्र किनारा पाहण्यासाठी लोक लांबून येतात. सायंकाळच्या वेळी तर समुद्रकिनारावरील नजारा पाहणे स्वर्ग पाहिल्यासारखा अनुभव देण्यासारखे असते.

सिंधुदुर्ग येथील देवबाग समुद्र  हा मालवणपासून 12 कि.मी. अंतरावर आहे. तसेच तारकर्लीपासून 6 किलोमीटरवर आहे. तुम्हाला कोकण रेल्वेने कुडाळ स्टेशनला उतरुन येथे जाता येऊ शकते. यासह मालवणपर्यंत थेट बस देखील तुम्हाला मिळू शकते. देवबागमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोकणातील अचंबित करणारे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतील.