झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार याची वाट न बघता समाजसेवक दीपक चव्हाण यांनी राबविले अनोखे अभियान

Admin
By -
सांगलीत समाजसेवक मारतोय स्वखर्चाने स्पीड बेकरवर पांढरे पट्टे :



शोले स्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांची स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम : पहिल्या दिवशी 5 स्पीड ब्रेकर रंगविले : जास्तीजास्त स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचा मनोदय


सांगलीचे शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड बेकारला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेंतर्गत शुक्रवारी रात्री त्यांनी बालाजी मिल रोडवरील पाच स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारत वाहन धारकांना स्पीड ब्रेकरची माहिती करून दिली आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी स्वखर्चातून हे अभियान सुरू केले आहे.

सांगली मिरजेमध्ये सध्या रस्त्यांची काम सुरू आहेत. अनेक ठिकाणी हॉटमिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने बनवण्यात आले आहेत.
हे स्पीडब्रेकर जरी महत्वाचे असले तरी ते दिसणं हे महत्त्वाचे आहे. मात्र अनेक स्पीड ब्रेकर न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येतील या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीडबेकरना पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री बालाजी मिल रोडवर ठिकठिकाणी न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपले सामाजिक भान राखत काम सुरू केले आहे.
सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पांढरेपट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेबाबत स्वागत होत आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे दीपक चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वीही दीपक चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या शोले स्टाईल गाडीवरून 555 दिवस प्रवास करीत दहा हजार किलोमीटर जाऊन 350 हून अधिक गावात कोरोना बाबत जनजागृती केले आहे. चाळीसहून अधिक कोविड सेंटर मध्ये त्यांनी गाण्यांचे कार्यक्रम केले आहेत. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी मोफत पणे 75 ठिकाणी देश गीतांचे कार्यक्रम केले आहेत. बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढत आहेत. समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या वेश्या वस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. आता त्याची स्व खर्चाने स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सांगलीकरांमध्ये चर्चेची आणि अभिमानाची गोष्ट बनुन राहिली आहे. या मोहिमेमध्ये सांगलीकर आणि सहभाग घ्यावा असे आवाहनही दीपक चव्हाण यांनी केले आहे.