सांगली जिल्हामध्ये भूकंपाचा धक्का

Admin
By -



      सांगली जिल्ह्यातील वारणा धरण (ता. शिराळा) परिसरात भूकंपाचा सौम्य स्वरूपाचा धक्का जाणवला. आज, सोमवारी पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी ३.० रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली. या वर्षातील हा तिसरा भूकंप आहे.
     
    आजच्या या भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला नाही. या धक्क्यामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्र बिंदू वारणा धरणापासुन २२.४ किलो मीटर अंतरावर होता

    भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाने सांगितले.