संजयकाकाच्या विरोधातला नेमका कोणता पैलवान निवडणुकीच्या मैदानात हेच फायनल झाले नाहीअसे म्हणत आ.पडळकरांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.
मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थित लावली त्यानंतर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पडळकर म्हणाले कि , “आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक बाहेर एक असे काही होत नसतं. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो आहे . मात्र अजूनहि भाजपचे उमेदवार संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान निवडणुकीच्या रिगणात आहे हे निश्चित झाले नसल्याने अजून सगळे लोक संभ्रमात आहेत
सांगलीत भाजपकडून खासदार संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यावेळी त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षातूनच काही जणांचा विरोध होता. मात्र पक्षाने पुन्हा संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे.