सांगलीच्या कृष्णामाई घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व जनजागृती अभियान उत्साहात संपन्न

Admin
By -


           सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कुपवाड व कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जनजागृती अभियान मंगळवार दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कृष्णामाई घाट, सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.



या कार्यक्रमात कृष्णा घाटावर मोठ्या प्रमाणात दीपोत्सव, आकर्षक रांगोळी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शेकडो दिव्यांनी उजळलेल्या घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती.

या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. तुषार जोशी साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात स्वच्छता अभियान, पाणी वाचवा, दुष्काळ निवारण या उपक्रमांबद्दल संस्थेचे, विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी समाजासाठी राबवलेले हे उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.



          या कार्यक्रमासाठी सुरज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण लुंकड व कृष्णामाई चॅरिटेबल ट्रस्ट सांगली चे महेंद्र भाऊ चंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

         सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव श्रीशैल मोटगी, प्रशासनाधिकारी रघुनाथ सातपुते, प्राचार्य प्रशांत चव्हाण, मुख्याध्यापक अधिकराव पवार, मुख्याध्यापिका सुनीता पाटील, स्पोर्ट इन्चार्ज विनायक जोशी, आयटी प्रमुख राजेंद्र पाचोरे, शैला कोटे मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी कृष्णमय घाटावर पालक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags: