महाराष्ट्र शासनाच्या "१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम" अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे!
आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे साहेबांना हा गौरवपूर्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक कारभार करण्यात सांगली जिल्हा परिषद आघाडीवर आहे, हे या पुरस्काराने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
