विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात ध्येय निश्चित करू आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करावी...जिल्हाधिकारी अमोल येडगे

Admin
By -



शिरोळ (07)
                   विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात भावी आयुष्यात काय व्हायचे आहे यासाठी आपले ध्येय निश्चित करून आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करावी कोणतेही क्षेत्र निवडा ते तुमच्या आवडीचे असावे तरच यशाचे  शिखर गाठता  येते असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथे बोलताना केले.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, चॅरिटेबल ट्रस्टच्या आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 2026 च्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील प्करी दीपक शिंदे प्रमुख उपस्थित होते.
 
               
                 जिल्हाधिकारी अमोल येडगे पुढे म्हणाले अभ्यासात सातत्य ठेवणे, स्वतःला शिस्त लावणे, सकारात्मक विचार जोपासणे ही यशाची गुरुकिल्ली आहे असे सांगून ते म्हणाले आई-वडिलांच्या विश्वासाला पात्र राहुन त्यांच्या स्वप्नाची पूर्ती करून त्यांना आनंद समाधान देणे हे प्रत्येक युवकांचे कर्तव्य आहे आयपीएस अधिकारी होताना सर्व क्षेत्राचा अभ्यास करावा लागतो तो अभ्यास विद्यार्थ्यांनी आत्मसात करून जोपासला पाहिजे असे सांगून ते म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यात काम करताना मला कोणतेही आव्हानात्मक काम वाटले नाही जिल्ह्याला वैचारिक बैठक आहे येथील लोक समजूतदार आहेत जनतेमध्ये सेवाभाव व सहकार्य करण्याची वृत्ती आणि भावना मला दिसली आहे अशी जनता मी कधी पाहिलेली नाही असे सांगून ते विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करावा अनावश्यक वापर करू नये शिवाय एआयचे भय मनात न ठेवता नवीन तंत्रज्ञानाला सामोरे जावे कृत्रिम बुद्धिमत्तेला न घाबरतात मानवी बुद्धिमत्तेने येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यावे असे आवाहन करून ते म्हणाले आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी हा सर्व क्षेत्रात चमकला पाहिजे माणूस आणि समाज घडवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे आई वडिलांच्या कष्टाची जाण प्रत्येक विद्यार्थी युवक मित्राने अखेरच्या श्वासापर्यंत ठेवली पाहिजे. वार्षिक स्नेहसंमेलनात आयएएस अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत समाज प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी व किरण पाटील यांनी मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाखतीतून नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली ही मुलाखत ऐकून व आत्मसात करून गुणवंत आणि यशवंत होईल यात शंका नाही दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी ठरेल असा आशावाद व्यक्त केला.


             प्रारंभी प्रास्ताविक सौ एस एन पवार यांनी केले प्रास्ताविक व अहवाल वाचन प्राचार्य डॉ.डी एन मुदगल ए एम नानिवडेकर यांनी केले.आभार पी बी पाटील यांनी मानले
यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, सचिव अशोक शिंदे सर्व संचालक मंडळ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते