प्रत्येक जण आपले पोट भरण्यासाठी काही ना काही काम करत असतो .काही गैरमार्गाचा वापर करतात तर काहीजण कष्टाने काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत पोट भरण्याचा प्रयत्न करीत असतात.
परदेशामध्ये असणारा गोल्डमॅन हा सर्वांनाच माहित आहे पण मुंबईमधील शिवाजी पार्क येथे गोल्डमॅन म्हणून ओळखला जाणारा राहूल.
राहुल हा मूळचा छत्तीसगडचा राहुल नट असे त्याचे नाव तो आई-वडिलांसह 2004 मध्ये मुंबई मधील पनवेल मध्ये भाड्याच्या घरात राहतो . पोटाची भूक भागविण्यासाठी राहुल ने चोरी केली त्यात तो अडकला अटक झाली शिक्षा भोगली अजूनही त्याची प्रकरणे कोर्टात सुरू आहे. मात्र ही वाट चुकीची असल्याची जाणीव त्याला होताच त्याने ती वाट सोडली.
पोट भरण्यासाठी राहून ने अनेक सहसी खेळ खेळले, अॅक्टीग केली सोशल मीडियावर शोधताना त्याला गोल्डमॅन आवडला, त्यानंतर राहुल रंग चढवून एकाच ठिकाणी थांबण्याचे ठरवले.
राहुल हा 2021 पासून शिवाजी पार्क येथे सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत उभा असतो . बारा तासामध्ये तो तासाभराने 25 मिनिटाचा ब्रेक घेतो. हे सगळे बघणाऱ्याला सोपे दिसत असले तरी त्यामागे खूप मेहनत आहे. एखाद्या पुतळ्यासारखे कोना बरोबर काही न बोलले ,हसवण्याचा प्रयत्न केला तरी न हसता स्थिर थांबणे हे अत्यंत अवघड आहे .पाऊस ,थंडी ऊन याची तमा न बाळगता पुतळा बनवून उभा राहावे लागते.
माझ्या कलेल काही जन दाद देतात ,काहीजण माझ्याबरोबर सेल्फी घेतात. यातूनच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो असे राहुलने सांगितले.