सांगली जिल्ह्यातील बसरगी तालुका जत येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे .
मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना दोन या अंतर्गत सांगली जिल्ह्यात 34 ठिकाणी एकूण क्षमता 207 मेगावॅटचे सौर प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेले आहेत या प्रकल्पापैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 75 कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या तक्रारी सुद्धा या सगळ्यामुळे दूर होतील. तसेच या योजनेमुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीसाठी ही चालना मिळणार आहे.
या कृषी वाहिन्यांना सौरऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या 16000 मेगावात क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे.