मंदार बनला ज्योतीच्या आयुष्याचा आधार

Admin
By -





एका मुलीच्या आयुष्याला मिळाला तिचा आयुष्यभराचा आधार कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात थाटामाटात पार पडला विवाह सोहळा.
लग्नाच्या वेळी दारामध्ये रांगोळी काढली जाते , मुले बेभान होऊन नृत्य करतात, लग्नाच्या आधी सर्वत्र लगबग सुरू असते, असाच एक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटा पार पडला तो कोल्हापूर मधील बालकल्याण संकुलात मंगळवारी सायंकाळी पाचच्या वेळेला बालकल्याण संकुलात लगबग सुरू झाले मांडव उभारला गेला मुले बेभान होऊन नृत्य करीत होती अंतरपाट धरला गेला मंगलाष्टके सुरू झाले वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते हा विवाह पार पडला कोल्हापूर मधील बालकल्याण संकुलातील लाडकी सुकन्या ज्योतिषीचा रूकडी तालुका हातकलंगडे येथील मंदार संजय खटावकर यांच्याशी मोठ्या थाटामाटात हा विवाह संपन्न झाला
      तर सुकन्या ज्योती हिसे कन्यादान डॉक्टर रागिनी आणि डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांनी केले 

         या सोहळ्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे ,जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. बी .पाटील ,पद्मजा तीवले, सुरेश शिपुरकर ,नंदिनी पतोडिया, एस. एन. पाटील, व्यकप्पा  भोसले, शिरीष बेरी, मानसी बेरी, सी.डी. तेली ,लोकमतचे उपवृत्त संपादक विश्वास पाटील, डॉ संदीप पाटील ,पद्मजा गारे , दीपा शिपुरकर यासह अनेक उपस्थित होते