खांद्यावर हात टाकत विशाल पाटलांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला महत्त्वाचा 'कानमंत्र'

Admin
By -महाराष्ट्रात काँग्रेसने तेरा लोकसभा मतदार संघात विजय मिळवला आहे. त्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सर्वांची बैठक आज मुंबईत येथे पार पडली. नाना पटोले यांच्यासह काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
नाना पटोले यांच्या हस्ते विशाल यांचा सत्कार झाल्यानंतर विशाल यांनी पटोलेंसह सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. पटोलेंना विशाल यांचा हात खेचत त्यांना थांबवले आणि विशाल पाटील यांच्या कानात काहीतरी सांगितले. हा कानमंत्र काय होता, याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

नाना पटोले यांनी दिलेला कानमंत्र विशाल पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरेल