‘जनहित महापौर आढावा अभियान’चे मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक ,

Admin
By -



         ‘जनहित महापौर आढावा अभियान’चे मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक ,

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत सविस्तर बैठक सपन्न झाली आहे.या बैठकीत मा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी विविध प्रकल्पांच्या बाबत माहिती देऊन चर्चा केली आहे.

        त्या मध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज, भुयारी  गटार प्रकल्प आणि नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १३० कोटी रुपयांच्या निधीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला .



        "‘जनहित महापौर आढावा अभियान’ हा नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे प्रभावी निराकरण करण्याचा लोकाभिमुख उपक्रम आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल."
— मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस


                सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या ‘जनहित महापौर आढावा अभियान’ या अभिनव लोकाभिमुख उपक्रमाचे  बाबत मा महापौर धीरज सूर्यवंशी. यांनी  आज मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस  यांना माहिती दिली आहे.
मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या उपक्रम बाबत विशेष कौतुक केले. समाधान व्यक्त केले आहे.

           या बैठकीत सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, ड्रेनेज व्यवस्था सुधारणा, भुयारी गटार प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी तसेच महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक असलेल्या १३० कोटी रुपयांच्या निधीबाबत मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

             यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ‘जनहित महापौर आढावा अभियान’ हा नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन समस्या, तक्रारी आणि विकासाच्या गरजा जाणून घेण्याचा प्रभावी उपक्रम असल्याचे नमूद केले. या अभियानामुळे प्रशासन अधिक जबाबदार, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
           सांगली शहराच्या विकासासाठी राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही देत त्यांनी आगामी विकासकामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शुभेच्छा देत संबंधित सर्वांचे अभिनंदनही केले.
          या बैठकीमुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णयांना गती मिळणार असून, शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

        दिनांक ३/८/२०२६ पासून  प्रभाग समिती क्र ३मधील दोन वार्ड मध्ये पूर्ण क्षमतेने आढावा घेण्यात येणार आहे , सहा आयुक्त यांच्या कडे तक्रारी,सूचना नागरिकांनी व सन्मानीय सदस्य यांनी  नमूद केल्या तर पुढील ७, दिवसात जास्तीत जास्त निपटारा करण्यास येणार आहे, 


Tags: