प्रा .डॉ पी .बी.पाटील यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कलाग्राम महोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात

Admin
By -


           प्रा .डॉ  पी .बी.पाटील यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कलाग्राम महोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात होत असून रांगोळी  स्पर्धेने या कला उत्सवाची आज सुरुवात होत आहे. 
          दिनांक 12 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान कलाग्राम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .यानिमित्ताने विविध कला प्रकारांची मेजवानीच सांगलीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज या उत्सवातील पहिल्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रा महाराष्ट्रातील विविध भागांसह गोव्यातील सुमारे 50 निवडक रांगोळी कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धा हे यंदाचे खास आकर्षण असून दिनांक 14 जानेवारी ते 20 जानेवारी  दरम्यान जिम्नॅस्टिक हॉल, शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे हे रांगोळी प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे .या प्रदर्शनाचा अधिकाधिक सांगलीकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक गौतम पाटील यांनी केले आहे  .
Tags: