हौसाई वृद्धाश्रमात मंत्री आठवलेंच्या वाढदिनी दिनदर्शिकेचे प्रकाशन
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचे सांगली जिल्ह्यासाठी महत्वाचे योगदान असून स्वर्गीय आर आर आबांच्या सोबत त्यांचा स्नेह होता सांगली जिल्ह्यात त्यांनी वृद्धाश्रम सुरु करून चांगले काम केले असल्याचे मत माजी आमदार सुमनवहिनी पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित हौसाई दिनदर्शिका २०२६ प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून दै लोकमतचे आवृत्ती प्रमुख अविनाश कोळी, सुप्रसिद्ध फोटोग्राफर महेश तावरे, तर अध्यक्षस्थानी खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार सुमन वहिनी पाटील पुढे म्हणाल्या आठवले साहेबांच्या माध्यमातून हौसाई वृद्धाश्रम सामाजिक क्षेत्रात भारी कामगिरी करीत आहे आम्ही सुधा योग्य ते सहकार्य करू असे प्रतिपादन केले.
केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्यानिमित केक कापून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले,स्वागत प्रास्ताविक ऋतुजा कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय लांडगे यांनी केले.
दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख अविनाश कोळी म्हणाले, राजकारणाबरोबर काव्य, भाषण शैली, स्पष्ट विचारांमुळे जनसामन्याचे नेते झाले. अशी ओळख संपूर्ण देशभर आहे. आणि हाच विचाराचा वारसा हौसाई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे पुढे चालवत आहेत. त्यांच्या हातून वृद्धांची सेवा घडावी. हीच रामदासजी आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेछ्या ठरतील. असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे मशाल हाती घेऊन वंचित शोषित गरीब व कष्टकरी जनतेसाठी आठवले साहेबांनी आवाज उठवला. पुण्य,कर्म कधीच सांगायचे नसते, आयुष्यात वादळ येत राहतात. त्यांना शांतपणे पाहायचं आणि पुढे चालत राहायच. वृद्धांना आधार देणारे पुण्याईचे काम संदेशभाऊ भंडारे हे करत आहेत, असे मत अविनाश कोळी यांनी मांडले.
यावेळी खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी रामदासजी आठवले यांच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास, जीवन प्रवास,जिद्द, संघर्ष, शालेय जीवनापासून केंद्रीय मंत्री पर्यंतचा खडतर प्रवास, शैक्षणिक राजकीय,कौटुंबिक, समाज कार्याचा उल्लेख त्यांनी आपल्या शब्दात मांडून जनसेवेचा संघर्ष करणारे नेते रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना राबवणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ठ केले.
यावेळी सुप्रसिद्ध फोटोग्राफर महेश तावरे, वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे , चैताली तातुगडे यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी संचालक हरिदास खबाले, शाहीर चंद्रकांत गायकवाड, अॅड. शिवाजीराव कांबळे, विकास भंडारे, अजय पवार, शकुंतला कांबळे, जयवंत माळी, धनराज जाधव, नजीर मुजावर, महेंद्र गाडे, चंदन बनसोडे, जितेंद्र पवार, रेखाताई शेंडे, सुमनताई वाघमारे, माजी उपसरपंच निर्मलाताई पवार आदी मान्यवरासह विविध संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मानले.
...................
फोटो ओळी - सांगली येथील हौसाई वृद्धाश्रमात केंद्रीय मंत्री रामदासजी आठवलेंच्या वाढदिनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना माजी आमदार सुमनवहिनी पाटील, खा रामदासजी आठवलेफाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे युथ लोकमतचे आवृत्ती प्रमुख अविनाश कोळी, सुप्रसिद्ध फोटोग्राफर महेश तावरे आदि मान्यवर .
