विटा येथे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सांगली जिल्ह्यातून राज्य कार्यकारिणीवर कुपवाड येथील सौ. आशालता अण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे क्रीडाशिक्षक श्री. सिद्धार्थ कांबळे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र महासंघाचे राज्याध्यक्ष आदरणीय एस. आर. भोसले साहेब यांच्या हस्ते श्री. कांबळे यांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. सिद्धार्थ कांबळे हे गेल्या दहा वर्षांपासून महासंघामध्ये सक्रिय व समर्पितपणे कार्यरत असून, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी पद्धतीने काम करून अनेक मागण्या मार्गी लावल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे सांगली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महासंघाचे कार्य अधिक प्रभावी आणि संघटित करण्यासाठी श्री. कांबळे यांनी आपले पूर्ण योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
