नव कृष्णा व्हॅली अभ्यास वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न

Admin
By -


            नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम अंतर्गत अभ्यास विभागात  14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. वेशभूषा  स्पर्धेचे  प्रमुख पाहुणे व निरीक्षक म्हणून सौ. उज्वला मोहिते, सौ.  ऋतुजा पेटकर, सौ. अश्विनी पाटील लाभलेल्या होत्या.
         सर्व प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  सरस्वती पूजन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची  सुरुवात करण्यात आली.
       वेशभूषा स्पर्धेतील   चिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेच्या  विविध व्यक्तिरेखांचे अप्रतिम सादरीकरण केले होते. यामध्ये शेतकरी,  पोलीस,डॉक्टर, परी, अंतराळ वीर, भाजीवाली छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, श्रावण बाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव, वारकरी अश्या विविध व्यक्ती वेशभूषेत लहानग्यांनी आवडता पात्रांच्या वेशभूषेत सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
                   वेशभूषा स्पर्धेचे निरीक्षक सौ.उज्वला मोहिते आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,- वेशभूषा स्पर्धेत मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला होता. आम्हास या ठिकाणी येऊन एक नवीन्यपूर्ण अनुभव घेण्यास मिळाला.
             वेशभूषा स्पर्धेचे निरीक्षक सौ. ऋतुजा पेटकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माझी मुलगी या शाळेत शिक्षण घेत आहे शाळेमध्ये .खेळाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून शाळेमध्ये विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.
             आपल्या  बालकांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी व त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी  आम्ही आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पालकांचा देखील सहभाग उस्फूर्त होता. 
           संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री.अधिकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली   करण्यात आले होते.
                  प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार  अभ्यास विभाग प्रमुख  सौ.योगिता विसापुरे यांनी केला. प्रास्ताविक सौ.प्रतिभा राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. अश्विनी जाधव यांनी केले.
Tags: