सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. आनंदराव घाटगे कुपवाड एमआयडीसी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी *‘विकसित भारत’* या विषयावर सादर केलेल्या गीत व पदनाट्याने सर्वांची मने जिंकली. परदेशात नोकरी करण्याऐवजी भारतातच कौशल्य विकसित करून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा संदेश या नाटकातून देण्यात आला.
यानंतर प्रमुख पाहुणे आनंदराव घाटगे यांचा सत्कार नव कृष्णा व्हॅली स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ. यशवंत तोरो यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि रोप देऊन करण्यात आला.
आपल्या मनोगतामध्ये श्री. आनंदराव घाटगे यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, *“शालेय जीवनात क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्याने स्पर्धेची जाणीव होते आणि आत्मविश्वास वाढतो. मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहा, वाचनाची सवय लावा आणि अभ्यासाबरोबर खेळाला वेळ द्या. स्वतः घडला तर देश आपोआप घडेल.” सुरज फाउंडेशन ही संस्था नेहमीच असे सामाजिक सांस्कृतिक उपक्रमामध्ये अग्रेसर असते. मा प्रवीण लुंकड यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन मुंबई बरोबर उपक्रम राबवीत असते.*
कार्यक्रमास सुरज फाउंडेशनच्या संगीता पागनीस संचालिका सुरज फाउंडेशन, अधिकराव पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम, प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम रघुनाथ सातपुते प्रशासकीय अधिकारी , विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज, राजेंद्र पाचोरे आयटी इन्चार्ज, श्रीशैल मोटगी अकाउंट विभाग प्रमुख व सर्व शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दीप प्रज्वलन करून त्रिपुरारी पौर्णिमेचा आनंद साजरा केला.


