सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या मार्फत दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2025 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे शालेय विभागीय स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 14, 17 व 19 वर्षाखालील वयोगटांमध्ये उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम ची विद्यार्थिनी श्रीनिधी भोसले हिने 14 वर्षाखालील वयोगटात पाचवा क्रमांक मिळवून राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
श्रीनिधीचे बुद्धिबळातील सातत्य, प्रचंड मेहनत आणि एकाग्रता ह्यांच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. तिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा ही दिनांक 12 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सातारा येथे पार पडणार आहे.
तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशामागे सुरज फाउंडेशन चे
मा. प्रवीणजी लुंकड – अध्यक्ष, सुरज फाउंडेशन,
संगीता पागनीस – डायरेक्टर, सुरज फाउंडेशन,
प्रशांत चव्हाण – उपप्राचार्य, नव कृष्णा व्हॅली स्कूल,
विनायक जोशी – स्पोर्ट्स इनचार्ज,
सुशांत सूर्यवंशी – क्रीडाशिक्षक,
अरुणा कुलकर्णी – बुद्धिबळ प्रशिक्षक,
आणि तिचे आई-वडील यांचे सततचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे.

