थिरुवनंतपुरम (केरळ) येथे नुकत्याच पार पडलेल्या “१६व्या साऊथ झोन शूटिंग चॅम्पियनशिप पिस्तूल (NR) २०२५” या स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूलची विद्यार्थिनी कु. रुची हिने उल्लेखनीय यश संपादन केले.
कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना रुचीने १० मीटर एअर पिस्तूल सब-युथ (महिला) गटात उत्कृष्ट नेमबाजी सादर करत ४०० पैकी ३५४ गुण मिळवले आणि राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
रुचीला संस्थेचे प्रवीणजी लुंकड अध्यक्ष – सुरज फाउंडेशन, संगीता पागनिस डायरेक्टर – सुरज फाउंडेशन, प्रशांत चव्हाण उपप्राचार्य – नव कृष्णा व्हॅली स्कूल, विनायक जोशी स्पोर्ट्स इनचार्ज आणि सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे.
विशेष म्हणजे रुची ही पूर्वी स्विमिंग खेळाडू होती. मात्र, दुखापतीमुळे तिला खेळाचा प्रकार बदलावा लागला. तरीसुद्धा तिने हार न मानता रायफल शूटिंगमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रुचीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, शिक्षकवर्ग व सहाध्यायींनी अभिनंदन व्यक्त केले असून राष्ट्रीय स्पर्धेत ती आणखी उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
