यंदाचा गणेश उत्सव, राज्योत्सव हा घरा घरात सांस्कृतिक वारसा जतन करणारा उत्सव झाला आहे. आणि या मुळे खऱ्या अर्थाने कुटुंबातील आनंद एकोपा वाढला आहे, असे पालकमंत्री घरगुती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
गेल्या १ महिन्या पासून सांगली, कुपवाड, मिरज भागात घरगुती सजावट स्पर्धेची विशेष तयारी पालकमंत्री कार्यालय मार्फत सुरु होती.
या विषयी चा बक्षीस वितरण सोहळा खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग येथे संपन्न झाला. या वेळी *प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपयाचे सोन्याचे नाणे प्रमाणपत्र*, *भेट वस्तू ऑपरेशन सिन्दूर देखाव्या साठी महेश मारुती चौंदिकर यांना*, *द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये सोन्याचे नाणे प्रमाणपत्र, भेट वस्तू नमामि गंगे जल शुद्धीकरण देखाव्यांसाठी अमित अरुण पाटील* याना तर *तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये सोन्याचे नाणे प्रमाणपत्र भेट वस्तू महा अवतार नृसिंह देखाव्यांसाठी संजय मुरलीधर बांदिवडेकर यांना* प्रदान करण्यात आले.
या शिवाय १०० स्पर्धांना उत्तेजनार्थ पारितोषिक व भेट वस्तू देण्यात आलीत.
सजावट स्पर्धा आयोजन पालकमंत्री कार्यालय ( GMO ) द्वारे करण्यात आली होती.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे दीपक बाबा शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, दिनकर तात्या पाटील, तसेच भाजप कोअर कमिटी सदस्य, माजी नगर सेवक, जिल्हा कार्यकारणी सदस्य, मंडल कार्यकारिणी सदस्य, पाचशे पेक्षा अधिक स्पर्धक व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात मनपा क्षेत्रातील साडेतीन हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विशेष भेट वस्तू व डिजिटल प्रमाण पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
सदर बक्षीस वितरणाचे आयोजन पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव,
पालक मंत्री योजना हेल्पलाईन कार्यालयाचे समन्वयक विजय वरुडकर, नरेंद्र यरगट्टीकर, केदार खाडिलकर,
डाॅ भालचंद्र साठ्ये व इतर पालक मंत्री प्रतिनिधींनी यांनी केले.