सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या मदत संकलनास डॉक्टर, शिक्षकांकडून प्रतिसाद

Admin
By -


          मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचा महापूरग्रस्तांसाठी मदत संकलनास प्रारंभ झाला आहे. दक्षिण शिवाजी नगर राजपूत ज्युनिअर कॉलेजच्या व्हाईट हाऊस बिल्डिंगमध्ये मदत संकलन मंगळवारी सुरू केले. त्याला डॉक्टर, शिक्षक, व्यापारी अशा समाजातील सुज्ञ मंडळींनी मोठा प्रतिसाद दिला. डॉ. सुधीर पाटील, डॉ निर्मला पाटील यांनी पुढाकार घेऊन 50 ब्लँकेट 10 चटई तर आपले सहकारी, डॉ सी बी जाधव 10 चटई 10 ब्लँकेट , डॉ रमेश जाधव 10 चटई 10 ब्लँकेट, डॉ. दिनेश भबान 10 चटई , डॉ विनय संकपाळ 10 चटई, डॉ इकलाख मुजावर 10 चटई , धीरज गुप्ता 5 चटई, रमेश पटेल 5 चटई अशी भेट दिली. चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रमशील शिक्षक महेशकुमार कोष्टी (बेडग आश्रमशाळा) यांनी १० हजार रुपयांची भरीव मदत सुपूर्द केली. डॉ. अमित कुमार सुर्यवंशी यांनी शैक्षणिक साहित्यासाठी 1 हजार रुपये देऊ केले.

          मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर, विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण शिंदे, सचिन ठाणेकर, सचिन सुतार, डिजिटल मिडियाचे पदाधिकारी अभिजित शिंदे, अक्रम शेख, नासिर सय्यद, यांनी ही मदत स्वीकारली.