या मुलीचे नाव आकांक्षा असेच सांगितले जात असून तिला डास मारून जपून ठेवण्याचा छंद जडलेला आहे .
ही मुलगी अगोदर डास मारते नंतर त्या डासांना नाव देत कागदावरती त्यांना चिटकवते डास मारलेले ठिकाण ,त्या डासाच्या मृत्यूची वेळ, दिवस अशा सर्व गोष्टी ती एका कागदावरती नोंदवते आणि तेथे चिकटपटीने डासाला चिटकवते. आज पर्यंत तिने डासांना अनेक नावे दिलेली आहेत.जशी मुकेश, प्रिया, रमेश अशी वेगवेगळे नावे तिने आज पर्यंत या डासांना दिलेल्या आहेत.
तिच्या या आगळ्यावेगळ्या छंदाचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.