अनेकजण मोठ्या बाता करतील पण आपल्या शहराचा विकास आपल्यालाच करायचा आहे - आ. जयंतराव पाटील*

Admin
By -


९ वर्षात कधीही न फिरकलेले  अनेकजण आता शहरात येतील




           मागील ९ वर्षात उरुण ईश्वरपुरकरांच्या मदतीला न धावून आलेले पुढील काळात अनेक मंत्री आपल्या शहरात येतील. मोठ्या मोठ्या बाता करतील. कारण त्यांना तुमच्या मताची गरज आहे. ते येतील बोलुन जातील पण आपल्या शहराचा विकास आपल्यालाच करायचा आहे. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ. जयंतराव पाटील यांनी केले. ते ईश्वरपूरातील प्रभाग ९ च्या कोपरा सभेत बोलत होते. 

             आ.जयंतराव पाटील म्हणाले, ९ वर्षांपुर्वी ज्यांना जबाबदारी त्यांनी हे शहर नादुरुस्त केले. यापुर्वी उभारलेल्या सोयी सुविधा देखील त्यांना जपता आल्या नाहीत. आपापसातील मतभेदांमुळे यांना एकमुखी कारभार करता आला नाही. भुयारी गटार योजनेचे काम यांच्या काळात पुर्ण झाले नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसविलेले शास्तीकराचे भूत आम्ही येणाऱ्या काळात उतरवू. जे चांगले आहे ते नेहमीच करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर प्रत्त्येक वॉर्डात आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक वॉर्ड सभा घेतील. माझ्या पक्षाचा नगराध्यक्ष हा स्कुटरवरुन फिरणारा आहे. हात दाखवेल तिथे थांबेल. पुर्ण वेळ काम करेल. 

                 ५ वर्षे कोणतेही ठोस काम न करता मतदानापुर्वी शेवटच्या दोन दिवसात आम्ही काहीही करु शकतो व मतदान मिळवुन शकतो. या अविर्भावात समोरचे लोक आहेत. 

                 आनंदराव मलगुंडे बोलताना म्हणाले की,या शहरात नव्याने कोणतेही ठोस काम मागील काळात झाले नाही. पालकमंत्र्यांनी फक्त वल्गना न करता त्यांनी दिलेल्या निधीचा खुलासा करावा. कोणतेही पुर्व नियोजन न करता भुयारी गटार योजनेसाठी खुदाई करुन शहराची वाट लावली. महायुतीच्या भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या काळात मला व माझ्या सहकाऱ्यांना संधी द्या आम्ही आपला विश्वास सार्थ ठरवु. 
भगवान पाटील बोलताना म्हणाले, मागील ९ वर्षात या भागात एखादे शौचालय देखील सत्ताधारी उभारू शकले नाहीत. मागील ३१ वर्षे विकास झाला नसता तर ग्रामीण भागातील लोक ईश्वरपुरात राहायला आलेच नसते. 

                निवास पाटील बोलताना म्हणाले,  भाजपाच्या करणी आणि कथणी मध्ये बदल झाल्याने मी पक्ष सोडला. भाजप हा मुळचा पक्ष राहिला नसुन तो बाहेरुन येणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. रेडीमेड कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढत नाही. ईश्वरपूरातील विरोधकांनी जयंतराव पाटील यांचा विकास मान्य केला. पण जवळ राहून जयंतराव पाटील यांनीच केलेला विकास यांनी कधीच मान्य झाला नाही. मागील ३१ वर्षे तुम्ही त्यांच्याच सावलीत वाढला. 

               मनिषा रोटे बोलताना म्हणाल्या, एखादी चांगली वागणारी सून घराबाहेर काढून दुसरी  भांडकुदळ सून घरी आणली की ती घर उद्वस्त करते अशी अवस्था आपली झाली आहे. आपण गेल्या निवडणुकीत ज्यांना संधी दिली त्यांनी आपले शहर उध्वस्त केले. 

              यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, भगवानराव पाटील, भिमराव पाटील, योजना शिंदे, योगिता माळी, सविता पाटील, सचिन हांडे,निवास पाटील, सचिन कोळी,अंगराज पाटील आदी उपस्थित होते.
Tags: