एखादा नात्यांमध्ये आपण फसवणूक करणे हे प्रत्येक वेळी वाईटच ते आपले जोडीदाराशी नाते असो किंवा आणखी कोणाशी ,असाच एक प्रताप समोर आलेला आहे एका व्यक्तीने तब्बल दहा वर्षे आपल्या जोडीदाराला धोका दिला ही व्यक्ती एकाच वेळी सहा मुलींसोबत संबंध ठेवत होती. पण या सर्वांची फसवणूक करण्यासाठी त्याने एक विशेष अशी सिस्टीम योजना तयार केलेली होती. पण एका पाळीव कुत्र्यामुळे त्याचे सगळे कारणामे उघडकिस आले.
ही घटना ब्रिटनमध्ये घडलेली आहे एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला दहा वर्षे अंधारात ठेवले. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार त्याने एक पूर्ण प्लॅन तयार केलेला होता. प्रत्येक गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी एक रंगीत कॅलेंडर तो वापरायचा प्रत्येक रंगाचा अर्थ कोणत्या दिवशी तो कोणत्या मुलीला भेटायचे असे ठरवतात असे यासोबत त्याच्याजवळ तीन फोन होते एक फोन सामान्य वापरासाठी तर इतर दोन फोन चिप्सच्या पाकिटात आणि घरातल्या एका नकली रोपांमध्ये त्यांनी लपवून ठेवलेले होते .तसेच आपल्या गर्लफ्रेंडचे लक्ष फोनवरून हटवण्यासाठी एका पोपटालाही त्याने खास प्रशिक्षण दिलेले होते जेव्हा फोनवर नोटिफिकेशन यायची तेव्हा तो पोपट वेगळा आवाज काढायचा त्यामुळे गर्लफ्रेंड चे लक्ष त्या पोपटाकडे जायचे .
याच्या एका गर्लफ्रेंड तिचा तिच्या कुत्र्यासोबत याच्या घरी आली .परत जाताना तिच्या कुत्र्याचे काही केस त्याच्या शर्ट वर चिटकलेले होते .जेव्हा पहिला गर्लफ्रेंड कडे हा परतला. तेव्हा तिला शर्टवर केसात कुत्र्याचे केस दिसले तिला कुत्रे अजिबात आवडत नसल्याने तिला संशय आला आणि तिने त्यावर अनेक प्रश्नांची सरबती केली अखेर या महाभागाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागली आणि दहा वर्षाचे खोटे सर्वांसमोर उघड झाले.