जैन प्रकोष्ठाच्या निर्मितीने जैन समाजाला न्याय – रावसाहेब पाटील

Admin
By -


                भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ आणि महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी येथे बैठक पार पडली. या बैठकीत भाजप जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांनी “जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर संघटनात्मक बळकटी आणता येईल. तसेच जैन समाजाच्या अडचणी एकत्र करून त्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडता येतील,” असे प्रतिपादन केले.
           ते पुढे म्हणाले की, “जैन समाजाची एकजूट निर्माण करण्यासाठी जैन प्रकोष्ठ हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी हे प्रकोष्ठ पुढाकार घेणार आहे. संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या लवकरच नेमण्यात येणार आहेत. तसेच जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन करतो,” असे त्यांनी सांगितले.
             या प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष श्री. ललितभाई गांधी यांनी महामंडळाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. “जैन समाजाला शासनस्तरावर सर्वांगीण मदत मिळावी यासाठी हे महामंडळ स्थापन झाले आहे. शिष्यवृत्ती योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आधार, जैन समाजातील स्त्री-पुरुषांना उद्योगधंद्यासाठी भांडवल, जैन साधूंच्या विहारासाठी आणि निवासासाठी व्यवस्था तसेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी मदत अशा विविध योजनांचा लाभ जैन समाजाला मिळणार आहे. लवकरच जिल्हास्तरीय कार्यकारिणी स्थापन करून या योजना सर्वदूर पोहोचवल्या जातील,” असे त्यांनी सांगितले.
बैठकीस जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्ष श्री. प्रशांत गोंडाजी, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. शितल पाटील, डॉ. ध्यानचंद्र पाटील, श्री. सुमतीलाल पुनीत, श्री. सुभाषजी लोढा, श्री. बाहुबली नगरकर, श्री. महेश बाफना, श्री. जयचंदजी पूर्णा आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन जैन प्रकोष्ठ पश्चिम विभाग प्रमुख श्री. लखन बाफना यांनी केले.