अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात महाराष्ट्राची भुमिका ठामपणे मांडण्यासाठी दोन्ही जिल्हयातील लोकप्रतिनिधी व अधिका-यांची दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न या बैठकीस आ.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांची उपस्थिती..
नवी दिल्ली येथे नवीन महाराष्ट्र सदन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास मिरजेचे आमदार. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदारांनी अभिवादन केले.
महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील व विभागाचे सेक्रटरी दिपक कपुर यांच्या उपस्थित अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात चर्चा झाली व या अनुषंगाने नवी दिल्ली येथील केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्णा विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय जलशक्ती यांच्या दालनात आ.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली
यावेळी केंद्रीय जलशक्ती विभागाच्या सचिव मुखर्जी मॅडम यांनी सांगितले की, अलमट्टी धरणांची उंची वाढविण्यावर मा. सुप्रीम कोर्टाकडुन स्थगिती असल्याने अलमट्टी धरणांची उंच वाढविता येता येणार नाही. तसेच एन.डी.एस एजन्सी यांच्यामार्फत सर्व्हे केला जाईल. त्यानुसार अलमट्टी धरणांचे काम केले असेल तर महाराष्ट्र शासनाकडुन सुप्रीम कोर्टामध्ये कॅवीड दाखल करण्यात येईल.
या बैठकीत अलमट्टी धरणाच्या संदर्भात ना. सी.आर.पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली व याबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन ना. सी.आर.पाटील यांनी दिले असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी दिली.
नवी दिल्ली येथे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी मर्या आयोजित नवीन महाराष्ट्र सदन मध्ये दिनांक 4 ऑगस्ट रोजी जागतिक कृषी महोत्सव सोहळ्याच्या 15 वर्षातील कार्याची यशस्वी वाटचाल दर्शविणारा सिंहावलोकन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी परमपुज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे आध्यात्मिक नेते व आ.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा व अन्य आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत होते.

