रक्तदान शिबिरास युवा नेते सुशांत दादा खाडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

Admin
By -



          भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान शिबीर संपन्न....

        भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी जय हिंद सोसायटी, मालगाव येथे भव्य महा रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात ३३० हुन अधिक रक्तदात्यांनी  रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. एम एस आय ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने सदरचे महा रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. सर्व रक्तदात्यांची भाजप च्या वतीने भेटवसू देऊन व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. 

      माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील शहरातील दोन व ग्रामीण मधील दोन अशा चार मंडळांच्या वतीने मालगाव येथील जयहिंद सोसायटी हॉल मध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महा रक्तदान शिबिरास भाजप युवा नेते सुशांत दादा खाडे, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, धनंजय कुलकर्णी, भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे, पश्चिम मंडल अध्यक्षा सौ.अनिता हारगे, उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नायकवडी, दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे, मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे, शशिकांत कनवाडे , शशिकांत वाघमोडे, अनिल हारगे, महेश धयारे, विक्रम पाटील, जयगोंडा कोरे, राजेंद्र नातू, जितेंद्र ढोले, अमरसिंह चव्हाण, दीपक सावंत, विनायक पाटील, दिनकर भोसले, मारुती जमादार , चंद्रकांत नाईक, किरण बंडगर, आप्पा पाटील, आनंदा गडदे, मनोज पाटील, मनीष देशपांडे, मिलिंद भिडे, सौ. सारिका राहुटे, कपिला पाटील, ज्योती मगदूम, रुपाली पवार, रेखा शेजवळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.