आयुष्यात सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तसेच लग्न हे पण आयुष्यात महत्त्वाचे असते असे सर्वत्र बोलले जाते. अशाच एका सुंदर बाहुलीची साधारण गोष्ट
एखाद्या मुलीच्या आयुष्यात जन्मापासूनच त्रास ला सुरुवात झालेली असते पण काही वर्षा नंतर त्या मुलीच्या आयुष्यात सुखाचा एक सूर सापडतो आणि तिच्या आयुष्य सुखमय होऊन जाते.
अनामिका नावाची मुलगी लहानपणापासूनच त्रासाला सामोरे जात मोठीहोताना दिसून येते या मुलीच्या आई-वडिलांचे वारंवार होणारे तंटे या मुलीने लहानपणापासूनच बघितलेले होते .आई-वडिलांच्या मध्ये होणारे तंटे बघतच ती मोठी होत होती पण त्यानंतर तिच्या मामाने तिला आपल्याबरोबर आपल्या घरी घेऊन गेला . तिथेच ती मामा आणि मामाच्या परिवाराबरोबर लहानाची मोठी झाली. खूप वर्षे मुलगी आपल्या पासून दूर राहिल्यानंतर आईने मुलीला आपल्या सोबत राहण्याची गोष्ट सर्वांना बोलून दाखवली त्यानंतर आई आणि मुलगी ही एकत्र राहू लागल्या.
याच दरम्यान या अनामिकेला एका तरुणा बरोबर प्रेम झाले. आई सोबत राहत असतानाच प्रेम संबंध बाबत मुलीने आईला माहिती दिली. मुलाची सर्व चौकशी केली असता तो मुलगा आपल्या मुलीला चांगले पद्धतीने सांभाळेल अशी आशा उराशी बाळगून त्या अनामिकेच्या घरच्यांनी त्या मुलाबरोबर आनामिकेचे लग्न लावून दिले. पण काही दिवसातच या मुलाने आपले स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली आणि त्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली.
शेवटी त्या अनामिकेला त्रास सहन न झाल्यामुळे तिने आपल्या आईकडे परत राहायला येण्याचा निर्णय घेतला. आईकडे असताना आपले शिक्षण पूर्ण करून ती स्वतःच्या पायावरती उभारली . पण या दरम्यान तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला त्रास देणे काही सोडले नाही. सरते शेवटी तिने तिच्या नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीच्या माध्यमातून उभी राहिली.
मुलीचे वय खूप झालेले नाही आणि आयुष्य पुढे कसे जाणारे याचा विचार करीत तिच्या घरच्यांनी पुन्हा तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अनेक मुलेही बघितले पण प्रत्येक वेळी काहीतरी अडचणी येत गेल्यामुळे तिचे लग्न हे लांबणीवर पडत होते.
सरते शेवटी अनामिकेला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला . घरच्यांनी शोधलेल्या मुलाबरोबर सरते शेवटी अनामिकेचे लग्न झाले आणि ते एकमेकांत बरोबर लग्नाच्या बंधनात अडकले . दोघांनीही एकमेकांसोबत सुखाने संसार करायला सुरुवात केली.
शहाणा मी केला अनेक वर्षापासून दुःख यातना सहन करावा लागल्यास तिला प्रेमळ साथीदार लाभला आणि त्यांच्या आयुष्य आनंदीमय झाले.
या बातमीशी कोणाचे सा धर्म आढळल्यास तो फक्त योगायोग आहे.
