शिंक येणं ही एक शरीराची सामान्य प्रक्रिया आहे. पण आपण शिकं आल्यावर sorry म्हणतो आणि पुढचा blass you असे म्हणतो.
याचे कारण
आपण आजकाल सर्वत्र एक गोष्ट अनुभवतो ती म्हणजे आपल्याला शिंक येणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. आपल्या नाकात धूळ, एखादा वास, अश्या अनेक गोष्टी आपल्या नाकात जातात तेव्हा त्याला बाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजे शिंक यालाच सेल्फ क्लिनिंग यंत्र असे आपण म्हणू शकतो.
आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असतो तेव्हा आपल्याला जर शिंक आली तर लगेच सॉरी किंवा एक्सक्युज मी असे म्हटले जाते हा एका प्रकारचा मॅनर्स आहे. याचे कारण म्हणजे आपल्या शिंकेमुळे दुसऱ्याला अस्वस्थ वाटणे किंवा रोगजंतू पसरण्याची शक्यता असते म्हणजेच या आपल्या कृतीमुळे दुसऱ्याला त्रास होऊ शकतो यासाठी सॉरी म्हटले जाते.
गॉड ब्लेस यु म्हणजे आल्यानंतर माणसाचा श्वास क्षणभर थांबतो त्यामुळे त्या व्यक्तीला गॉड ब्लेस यु असे म्हटले जाते. यामधून पुढच्या व्यक्तीची काळजी, सहानुभूती आपुलकी ही दिसून येते,
