चिखलात स्टंट करणं तरुणाला चांगलंच भोवळ

Admin
By -



सध्या पावसाळा सुरू झालेला आहे अनेक पर्यटक पर्यटन स्थळाला भेट देताना दिसून येत आहे असेच महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक या परिसरामध्ये एक युवक आपल्या चार चाकी गाडीवर चिखलामध्ये इन्स्टासाठी स्टंट करून रील बनवताना आढळून आला. त्याच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

          महाबळेश्वर हे नेहमीच पर्यटकांचा आकर्षक केंद्रबिंदू आहे याच ठिकाणी वेण्णा लेख हा सुद्धा सुंदर परिसर या भागामध्ये घोडेस्वारी होते. पण मुसळधार पावसामुळे या मैदानावर घोडेस्वारी होत नाही .तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झालेला असल्यामुळे या चिखलामध्ये काही हाऊस युवक सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी चार चाकी गाडीचे स्टंट करीत होते .या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून चिखलात चिखल उडवत स्टंट करणाऱ्या युवक संग्राम गणेश शितोळे राहणार जांबे दत्तवाडी जिल्हा पुणे यावर कारवाई केलेली आहे