2 लाखाची लाच मागणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाला अकलूज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.
याबाबतची अधिक माहिती अशी की तक्रारदारी यांचे श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती या नावाने त्यांची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये विविध नगरपरिषद ,नगरपालिकेत साफसफाई व इतर कामकाजासाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम ही कंपनी करते .सदर कंपनीच्या वतीने विविध आस्थापनांशी समन्वय साधून विविध प्रकारचे टेंडर भरणे विविध ठिकाणी मनुष्यबळ पुरविणे तसेच शासकीय कामे ही कंपनी करते.
अकलूज नगर परिषदेतील शहरातील रस्ते, बाजारपेठ ,शौचालय साफसफाई करण्यासाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याकरिता प्रसिद्ध केलेल्या टेंडर श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती यांना मंजूर झाले होते सदर कंपनीने अकलूज नगरपालिकेस मनुष्यबळ पुरवठा केला होता, टेंडर मंजूर झाल्यानंतर निविदा दर मंजूर करून वर्क ऑर्डर देताना लोकसेवक नितीन सिद्राम पेटकर (वय वर्ष 40) (स्वच्छता निरीक्षक अकलूज नगरपरिषद अकलूज)( रा. बासलेगाव रोड पिरजादे प्लॉट लोखंडे मंगल कार्यालय जवळ अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर), तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या 3% रक्कम व वर्क ऑर्डर मंजुरीचे 1 लाख 50 हजार रुपये असेल एकूण 1 लाख 95 हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली, तक्रारदार यांच्या तक्रारीची शहानिशा करून, तक्रारदाराच्या तक्रारीनुसार स्वच्छता निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. स्वच्छता निरीक्षकाच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.