पत्नी आपल्या घरी नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची गंभीर घटना घडलेली आहे
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अधिकराव पांडुरंग तांबेकर -पाटील (वय वर्ष 48. रा. शेवाळेवाडी येवती तालुका कराड जिल्हा सातारा) व वंदना अधिकराव तांबेकर -पाटील (सध्या राहणार कडेगाव). हे दोघे पती-पत्नी असून दोघांमध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नी वंदना या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांची बहीण वैशाली पाटील यांच्याकडे कडेगाव येथे राहत आहेत. पती आधी कराव हे सातत्याने आपण परत एकत्र आपल्या गावी शेवाळेवाडी येथे राहूया अशी वारंवार विनंती वंदना यांना करत होते परंतु दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नी वंदना या नांदायला जात नव्हत्या याचा राग अधिकराव यांच्या मनात होता संशयित अधिकराव हे सकाळी कडेगाव येथे पत्नी वंदना जेथे राहते त्या घरी आले त्यांनी काही एक न बोलता पाठीमागून येऊन पत्नी वंदना तिच्या पाठीवर चाकूने मारून तिला खाली पाडले. त्यानंतर पोटावर ठिकठिकाणी वार करून गंभीर जखमी केले तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वंदना जखमी झाल्यानंतर तिचा आरडा ओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळीत धाव घेतली आणि होणारा पुढचा अनर्थ टळला. नागरिक व नातेवाईकानी जखमी वंदना हिला उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले .या घटनेची कडेगाव पोलीसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव हे करीत आहेत