मिरज शहरामध्ये कर्नाटक तसेच परराज्यातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचाराच्या निमित्ताने मिरजेत येतात ते येताना बस किंवा रेल्वेचा आधार घेत असतात अशाच बस स्थानकावर व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एजंट अशा गरजू रुग्णाला हेरून आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली त्यांची मोठी फसवणूक करीत आहेत ते अशा गरजू रुग्णांना गाठून दवाखान्याकडे उपचारांपेक्षा रामबाण आयुर्वेदिक उपचाराने तुमचा आजार बरा होईल याची खात्री देतात यासाठी भोदू वैद्याने बस स्थानक रेल्वे स्टेशन व अनेक परिसरामध्ये आयुर्वेदिक दुकाने थाटलेली आहेत.
गरीब व अशिक्षित अशा रुग्णांची दररोज अनेक रुपयांचे फसवणूक सध्या होत आहे आयुर्वेदिक औषधासाठी साधारण दहा ते पंधरा हजार रुपये हे भोंदू वैद्य घेतात .तुमचा रोग हा हमखास बरा होणार असे पटवून देवून रुग्णांच्याकडून हे पैसे लाटत आहेत. जरी हा भोंदू वैद्यांकडून रुग्णाला फरक आला नाही तर रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक जर पैसे परत मागायला गेले तर अशा भोंदू वैद्य व त्यांच्या एजंट करून अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दमदाटी केली जाते.
मिरज मधील रेल्वे स्टेशन चौक ते बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर किरकोळ वस्तू घेऊन विक्रेते म्हणून बसलेल्या महिला या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या मधील आजारी रुग्ण शोधत असतात त्यांना हेरून ते दुकानात नेतात त्यांना गंडा घालणारा भोंदू वैद्य हा त्यांची वाट बघत बसलेला असतो, कोणतेही औषध तेही स्वस्तात मिळेल असे सांगितले जाते. वेगवेगळे औषधांची पूड एकत्र करून ती रुग्णांना देण्यात येते त्याची किंमत हजारांवर असते. हे तयार केलेले औषध सक्तीने घेण्याचे ही यावेळी सांगितले जाते
अशा भोंदू वैद्य आणि एजंटांवर कठोर कारवाई होण्याची मागणी अनेक नागरिकांच्या मधून जोर धरत आहे.