संजयकाकांची प्रचारात आघाडी पक्षात इन्कमिंगने , काकांचे पारडे जड

Admin
By -





            तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात निवडणूकीत रंगत येऊ लागली आहे. निवडणुकीतील अर्ज माघारीच्या टप्प्यानंतर लढत स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट व राष्ट्रवादी अजितदादा गटात दुरंगी चुरशीची दिसू लागली आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार मा.संजय काका पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व जनतेमध्ये उत्साह आलेला आहे. त्यामुळे संजय काकांचे पारडे जड झाले आहे. 

             तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांची उमेदवारी अगोदरच निश्चित झाली होती. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोण असेल याची जनतेला उत्कंठा लागली होती. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने संजय काका यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी रोहित पाटील यांना एकतर्फी निवडणूक वाटत होती. कवठेमहांकाळ मधील सर्व मान्य नेतृत्व माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी राष्ट्रवादी अजितदादा प्रवेश करून संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने संजय काका पाटील यांचे पार्टी जड झालेले आहे. 

            दरम्यान, कवठेमंकाळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जोरदार हवा तयार होऊ लागली आहे. रोज कवठेमंकाळ शहरात तसेच ग्रामीण खेड्यापाड्यातून, अनेक गावातून अजितदादा गटात मोठ्या संख्येने प्रवेश होत आहेत. अनेक दिग्गज पक्षात सामील होत आहेत. माननीय प्रभाकर बाबा पाटील व राजवर्धन घोरपडे हे मैदानात उतरले असून त्यांनी गावे पिंजून काढून राष्ट्रवादीच्या घड्याळाचा प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे संजय काका पाटील यांचे पारडे जड झाले आहे.