नांद्रेत सुधीरदादांना प्रचंड मताधिक्य देऊ

Admin
By -





         नांद्रे गावासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भरभक्कम असा विकास निधी दिलेला आहे. त्या निधीच्या माध्यमातून तसेच सुधीरदादांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. अशा कार्यसम्राट सुधीरदादांना नांद्रे गावातून प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करू ,अशी ग्वाही गावातील भाजप तसेच महायुतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दिली.
         नांद्रे येथील हनुमान मंदिरात सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ मोठ्या जल्लोषात झाला. सुधीरदादांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच फटाक्यांची दणकेबाज आतषबाजी झाली. महायुती तसेच सुधीरदादांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, युवा नेते पृथ्वीराज पवार,राहुल सकळे, शिवसेनेचे नेते  नानासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
        शेखर इनामदार म्हणाले,नांद्रे गावासाठी सुधीरदादा गाडगीळ यांनी तब्बल ५५  कोटी रुपयांचा विकास निधी दिलेला आहे. त्या अनुषंगाने गावातील सर्व विकासकामे पूर्ण झाली आहेत. ग्रामस्थांच्या आणखी विकासकामांच्या ज्या आणखी अपेक्षा असतील त्यासुद्धा सुधीरदादा निश्चितच पूर्ण करतील. पूर्वी आपली ताकद नांद्रे गावात कमी होती पण आज मोठ्या प्रमाणात नांद्रे गावात आपले ताकद वाढली आहे.निश्चितपणाने सुधीर दादांची हॅट्रिक होणार यात शंका नाही त्यांना या खेपेस गावातून प्रचंड मताधिक्य मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.
        दिनकरतात्या पाटील म्हणाले, सुधीरदादांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. याशिवाय राज्यातील महायुती शासनाने लाडकी बहीण, ज्येष्ठ नागरिकांसाठी , शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी तसेच आयुष्यमान योजना, गोरगरिबांना मोफत धान्य  अशा अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे समस्त समाज आज महायुती शासनाच्या कामकाजावर खुश आहे. त्याचबरोबर सुधीरदादांसारख्या अत्यंत कर्तबगार आणि कार्यतत्पर  आमदारांच्या कामाबद्दलही लोकांचा समाधान आहे.
          पृथ्वीराज पवार म्हणाले, नांद्रे गावाचा विकास करण्यासाठी सुधीरदादांनी गेली दहा वर्षे सातत्याने लक्ष दिले आहे. अत्यंत प्रामाणिक ,कार्यतत्पर आणि चारित्र्यसंपन्न अशा या नेत्याला पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. सुधीरदादाच सांगलीची आणखी चौफेर प्रगती करतील.
          नांद्रे येथील  ग्रामस्थांनीही सुधीरदादांच्या कामकाजाबद्दल मनःपूर्वक समाधान व्यक्त केले. ग्रामस्थ म्हणाले, यापूर्वी नांद्रे गावाकडे फारसे कुणी लक्ष देत नव्हते. परंतु सुधीरदादांनी आमदार झाल्यापासून या गावाकडे विशेष लक्ष दिले आहे. ग्रामस्थांनी केलेल्या प्रत्येक मागणीचा त्यांनी आपुलकीने आणि आस्थेने विचार केला आहे. त्यामुळे संपूर्ण  गाव त्यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.
         आमदार गाडगीळ म्हणाले, या गावाने नेहमीच मला पाठबळ दिले आहे. यापुढेही ते कायम राहील याचा मला विश्वास आहे. गावात अनेक विकास कामे झाली आहेत. उर्वरित कामेही निश्चित पूर्ण केली जातील अशी हमी मी घेतो.  मतदानरुपी आशीर्वाद जनतेने मला द्यावा.
        यावेळी शिवसेनेचे नेते नानासाहेब शिंदे ,महेश पाटील, राष्ट्रवादीचे महेश साळुंखे, सुभाष पाचोरे, सुरेश सावळवाडे ,शितल सकळे, सतीश हेरले, डॉ. पंकज कुपवाडे ,वृषभ पाटील, कलगोंडा पांढरे,किरण पाटील, प्रवीण शेटे,नाना पाटील, सागर माने ,रावसाहेब पाटील, रावसाहेब ऐतवडे, विनोद पाटील, किशोर पाटील, गुंडू पाटील, विजय चौधरी, मोहसीन मुल्ला, अरविंद कुरणे, विक्रम कांबळे, सैफ मुजावर, सुनील राजोबा  उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष ,राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते आणि  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते  नेत्यांची भाषणे सुरू असताना  उपस्थित लोक सुधीरदादांच्या विजयाच्या घोषणा देत होते.





       सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचाराचा नांद्रे येथे प्रारंभ झाला.




    नांद्रे येथील प्रचार प्रारंभाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.